नाशिक: पोलिस चौकीतून फरार झालेला संशयित आरोपी जेरबंद

नाशिक। दि. १२ ऑगस्ट २०२५: पोक्सोच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अतुल उर्फ लिंब्या प्रकाश तुंबडे (२०) या संशयिताने पोलिसांच्या हाताला झटका देत पलायन केले होते.

त्याला अंबड पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले. फिल्ट्ररेशन प्लान्ट, हेगडेवार चौक, सिडको येथे ही कारवाई केली. ९ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता पवननगर पोलिस चौकीतून संशयिताने पलायन केले होते. पथकाचे मयूर पवार यांना संशयित हेगडेवारनगर येथे मनपा प्लान्टमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790