🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: गांजा विक्री करणारा जेरबंद, दीड लाखांचा ५ किलो गांजा जप्त

नाशिक। दि. २ ऑगस्ट २०२५: गांजा विक्री करणाऱ्या तस्कराला अटक करण्यात आली. गंगापूर आणि खंडणीविरोधी पथकाने क्रांती चौक, गंगापूर गाव येथे ही कारवाई केली. संशयिताकडून ५ किलो गांजा आणि चिलीम आणि प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. अनिल दत्तू गुंजाळ (३७) असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

वरीष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत यांनी याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने क्रांती चौक येथे सापळा रचला. पोलिस कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून पाठवले. संशयित गांजा विक्री करण्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला. घरातून दिड लाखांचा गांजा आणि अन्य साहित्य जप्त केले. गंगापूर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता ४ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790