नाशिक: जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी 29 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत

नाशिक, दि. 14 जुलै, 2025 (जिल्हा माहिती कार्यालय): दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू झाली असून 29 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन आवेदन पत्र सादर करावेत, असे दिंडोरी खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

जिल्ह्यातील जे विद्यार्थी, विद्यार्थिनी 2025-26 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहेत, ज्यांची जन्मतारीख 01 मे 2014 ते 31 जुलै 2016 च्या दरम्यान आहे व नियमित इयत्ता तिसरी व चौथी उत्तीर्ण झाले असून जे विद्यार्थी नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहेत, असे विद्यार्थी प्रवेश चाचणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासंबधी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर व तसेच जवाहर नवोदय विद्यालय समिती क्षेत्रीय कार्यालय, पुणे https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही परीक्षा 13 डिसेंबर 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य व पालक यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहनही प्राचार्य श्री. स्वामी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790