नाशिक: मेट्रोसह, द्वारका, दत्त मंदिर ते नाशिकरोड उड्डाणपूल गरजेचा- आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले

विधानसभेत आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी मांडली विशेष सूचना !

नाशिक। दि. २ जुलै २०२५: नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरालगतच्या प्रमुख तालुक्यांना जोडले जात असल्यामुळे मुंबई-पुण्याप्रमाणे एक चांगली अद्ययावत मेट्रो तसेच द्वारका चौक ते दत्त मंदिर मार्गे नाशिक रोड असा उड्डाणपूल तातडीने उभारणे गरजेचे असल्याची विशेष सूचना भाजपाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी विधानसभेमध्ये मांडली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

द्वारका ते नाशिक रोड या दरम्यान वाहतूक कोंडी होत असून मागील दहा वर्षात अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे दत्त मंदिर चौक, नाशिक रोड ते द्वारका चौक या ठिकाणी चार पदरी डबल डेकर उड्डाणपूल तातडीने उभारण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव तयार करावा तसेच तो राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पुढील मागण्या केल्या:
👉 मुंबई-पुण्याप्रमाणे भविष्यात नाशिक शहराचा विकास करण्यासाठी अद्ययावत मेट्रो द्यावी.
👉 ओझर विमानतळ सिन्नर, 3 इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडता येईल अशा पद्धतीने मेट्रो आणि रिंग रोड कनेक्टिव्हिटी व्हावी.
👉 त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर, 3 काळाराम मंदिर, चामार लेणी मुक्तिधाम, तपोवन, ऐतिहासिक बोधिवृक्ष, बुद्ध स्मारक, अशा धार्मिक स्थळांना पर्यटन विभागाच्या निधीमधून विकास करावा.
👉 आडगाव येथे नियोजित आयटी हबसाठी केंद्र शासनाच्या मदतीने प्रस्ताव तयार करावा.
👉 गावठाण पुनर्विकासअंतर्गत पंचवटी मधील धोकेदायक वाडे व जुन्यावाड्यांचा विकास करावा त्यासाठी विशेष एफएसआय द्यावा. अशा मागण्या त्यांनी केल्या.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here