नाशिक: मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना बेड्या !

नाशिक। दि. १९ जून २०२५: सातपूर परिसरातील मंदिरांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेट्यांमधील रक्कम चोरून नेणाऱ्या तिघा तरुणांना गंगापूर पोलिसांनी कार्बननाका परिसरातून बेड्या घातल्या. या तिघांकडून दुचाकीसह ७४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

शिवाजी नाना कड (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर येथील गणेश कृष्ण मंदिर तसेच महाकाली माता मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. गणेशकृष्ण मंदिरातून ६०००, तर महाकाली माता मंदिरातील दानपेटीतून दोन हजार रुपयांची रक्कम चोरून नेली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कार्बननाका परिसरात सापळा रचला असता, संशयित सुदर्शन अंकुश महाजन (२२, रा. विश्वासनगर, सातपूर), पृथ्वीराज सुखदेव मराठे (२०, रा. हृदयेश्वर महादेव मंदिराजवळ, सातपूर), राहुल सतीश कोळी (२४, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. तिघेही धुळ्याचे आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790