नाशिक: लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

नाशिक। दि. १९ जून २०२५: सासरच्या व्यक्तींनी एक लाख रुपयांसाठी १९ वर्षीय विवाहितेचा छळ करत घराबाहेर काढून दिल्याची तक्रार महिला सुरक्षा विभागाकडे प्राप्त झाली. पीडितेच्या पत्रानुसार सातपूर पोलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

पीडिता १९ वर्षीय असून ३० जून ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान पती, सासू व नणंद यांनी तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. तिला उपाशी ठेवून, शिवीगाळ करून व मारहाण करत वारंवार एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने पीडितेला घराबाहेर काढले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790