🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. १४) पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. १३ जून २०२५: सिडको व नाशिक पूर्व भागात शनिवारी (दि. १४) पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या मुकणे रॉ वॉटर पम्पिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीमार्फत शनिवारी (दि. १४) रोजी पावसाळापूर्व विविध दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

यासाठी महावितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मनपाचे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिक शहरातील सिडको व नाशिक पूर्व भागास पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790