🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: विनयभंगाच्या गुन्ह्यातील ५ महिन्यापासून फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

नाशिक। दि. १० जून २०२५: महिलेला घरातून ओढून तिला मारहाण करत विनयभंग करत फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने दत्त मंदिर सिग्नल येथे ही कारवाई केली. मयूर उर्फ चिंट्या विवेकानंद वाघमारे (२८, रा. मोटवानी रोड) असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे नितीन फुलमाळी यांना माहिती मिळाली. २७ जानेवारीला उपनगर पोलिस ठाण्यात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयित गुन्हा घडल्यापासून फरार होता. दत्त मंदीर सिग्नल परिसरात पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला ताब्यात घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790