नाशिक: ‘एमडी’ विक्रीप्रकरणी दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): विहीतगाव, महाराज बस स्टॉपजवळ पोलिसांनी सापळा रचून दोघा युवकांकडून ठाण्यातील मुंब्रा येथून खरेदी करून विक्रीसाठी आणलेले तीस हजार किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले आहे. विहीतगाव मथुरारोड येथील मनपाचे मैदान परिसर हा अमली पदार्थ मद्यपी यांचा अड्डा होऊन बसला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

शहर अमली विरोधी पथकाचे कर्मचारी संजय ताजणे यांना विहीतगाव महाराज बसस्टॉपजवळ दोन युवकांनी एमडी अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाली. अमली विरोधी पथकाने गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास महाराज बसस्टॉपजवळ सापळा रचून संशयित सोमेश्वर ऊर्फ बाळा उत्तम हांगरंगे (वय २७, रा. स्वागत बिल्डिंग, महाराजा बसस्टॉप) आणि साहिल मोहन निकम (२३, रा. हरिपुरा अपार्टमेंट, महाराज बसस्टॉप) या दोघांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा ग्रॅम वजनाचे तीस हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज मिळून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

त्या दोघांनी हे अमली पदार्थ ठाण्याच्या मुंब्रा येथील सद्दाम याच्याकडून विकत घेऊन विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शिंदे येथे ड्रग्ज सापडले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790