नाशिक: १४ वर्षीय मुलीचे अपहरण करत अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सश्रम कारावास

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीचे अपहरण करत पिंपळगाव बसवंत येथील मित्राच्या घरी नेऊन त्याला पत्नी असल्याचे सांगून या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. १५ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. भावेश उर्फ उदयलाल तेली (मूळ रा. राजस्थान, हल्ली रा. पिंपळगाव बसवंत) असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर गुन्हा हा अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, २०१६ मध्ये अंबड येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला आरोपी भावेश तेलीने लग्न झाल्याचे लपवून ठेवत लग्नाचे आमिष देत तिचे अपहरण केले होते. पिंपळगाव बसवंत येथे मित्र परस बैरावा याला पत्नी असल्याचे सांगत त्याच्या खोलीवर मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सी. के. देवरे यांनी तपास करत आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळे करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष, तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. पैरवी आर. बी. आजगे, दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here