नाशिक, दि. १६ मे २०२५: सध्या राज्यभर ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. मान्सूनपूर्व पावसाचा हा जोर पुढील दोन आठवडे नाशिकसह राज्यातील १४ जिल्ह्यांत कायम राहण्याचा अंदाज हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
अरबी समुद्र व तेलंगणा अशा दोन ठिकाणी केंद्र असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून वळवाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या १४ जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक रहाणार आहे. ३१ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईपर्यंत राज्यात अवकाळीचे वातावरण राहिल. मान्सूनचा नव्हे तर मान्सूनपूर्व वीज, वारा व अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790