Amazon

नाशिक: सिटी सेंटर मॉल परिसरातील वीजपुरवठा तासाभरात सुरळीत होण्याची शक्यता

नाशिक । दि. १३ मे २०२५, सायं: ६:४० मि.
सिटी सेंटर मॉलसमोर असलेल्या सिटी 1 या 11 केव्ही विद्युत वाहिनीवर आज (दि. १३) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान झाड कोसळल्याने या वाहिनीवर अवलंबून असलेल्या सिटी सेंटर मॉल, लवटे नगर, क्रांतीनगर या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नरत असून तासभरात वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790