दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर…

Maharashtra Board 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

कुठे पाहता येईल निकाल?:
https://sscresult.mahahsscboard.in/
https://sscresult.mkcl.org/
https://results.targetpublications.org/

निकालाची विभागनिहाय टक्केवारी
👉 पुणे : 94.81 टक्के
👉 नागपूर : 90.78 टक्के
👉 संभाजीनगर : 92.82 टक्के
👉 मुंबई : 95.84 टक्के
👉 कोल्हापूर : 96.78 टक्के
👉 अमरावती : 92.95 टक्के
👉 नाशिक : 93.04 टक्के
👉 लातूर : 92.77 टक्के
👉 कोकण : 99.82 टक्के

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790