महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या नाशिक मंडळाच्या अधिक्षक अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आलेले राजेश जनार्दन थूल यांनी मंगळवारी ६ मे रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी भांडुप परिमंडळातील मुलुंड विभाग येथे कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. रुजू झाल्यानंतर नाशिक येथील विद्युत भवन येथे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

यापूर्वी अधीक्षक अभियंता पदी कार्यरत असलेले ज्ञानदेव पडळकर यांची प्रशासकीय बदली रास्तापेठ मंडळ, पुणे येथे झाली आहे.
महावितरणमध्ये थूल यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत विविध पदावर काम केले आहे. १९९४ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून अति उच्च दाब मंडळ, कळवा येथून त्यांनी सेवेची सुरुवात केली. तसेच उपकार्यकारी अभियंता या पदावर वाडा, बदलापूर व कल्याण या उपविभागामध्ये तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कल्याण पूर्व उपविभागात कार्य केलेले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

तसेच कार्यकारी अभियंता म्हणून कराड, भांडुप शहर, मुख्य कार्यालय येथेही सेवा दिलेली आहे. येथे येण्यापूर्वी ते कार्यकारी अभियंता मुलुंड विभाग येथे कार्यरत होते. पदोन्नतीवर त्यांची अधिक्षक अभियंता नाशिक येथे नियुक्ती झाली. नाशिक येथे रुजू झाल्यानंतर अधिक्षक अभियंता यांचे महावितरण कर्मचाऱ्यांनी व सर्व संघटना प्रतिनिधी यांनी स्वागत केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790