नाशिक: युवकाकडून ४ ग्रॅम एमडी जप्त

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोडला एका युवकाकडून पोलिसांनी ४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. २० हजार रुपये त्याची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

नाशिकरोड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जेलरोडच्या गोकुळनगर, शिवाजीनगर येथील संशयित अभिजित सोनार यास ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ३ प्लास्टिक पुड्यांमध्ये चार ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य- आयुक्त डॉ. किरण पाटील
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790