नाशिक: ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चालविताना तोल गेल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अलका देवराज गुज्जर (३१, रा. बोरगड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अशोक स्तंभाकडून रामवाडीच्या दिशेने दुचाकीने (एम. एच १५ जे झेड ५२६१) प्रवास करताना आधाराश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांचा तोल गेला. यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूला कोसळल्याने पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून त्या चिरडल्या गेल्या. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

तातडीने गंभीर जखमी अवस्थेत गुज्जर यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ ट्रॅक्टर उभा करतो, असे सांगून चालक तेथून पसार झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790