नाशिक: सिगारेटच्या बहाण्याने सोनसाखळी खेचली…

नाशिक (प्रतिनिधी): माडसांगवी शिवारात किराणा दुकानात सिगारेट खरेदीसाठी आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याबाबत शिंदे नामक महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यावरून दोघा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांचे माडसांगवी शिवारात कृष्णा साई किराणा दुकान आहे. गेल्या मंगळवारी सायंकाळी शिंदे किराणा दुकानात बसलेल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने दुकानात येऊन सिगारेट खरेदीचा बहाणा करत शिंदे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवर बसून पलायन केले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या दक्षिण भागात ३१ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा इशारा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790