नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विकासपर्व प्रत्यक्षात आणले. ‘माझं नाशिक, माझी जबाबदारी’ हे ब्रीद त्यांनी कसोशीने पाळले. त्यांनी दोन पंचवार्षिक आमदार म्हणून केलेल्या कार्यामुळे मतदारसंघातील बहुसंख्य नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या विकासपर्वाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. विविध समाजघटकांनी त्यांना पाठिंब्याची पत्रे पाठवली आहेत. श्री संत सावतामाळी समाजमंदिराचे अध्यक्ष गोविंद विधाते, उपाध्यक्ष शंकर कमोद, सेक्रेटरी नितीन कानडे, खजिनदार शशीकांत जुन्नरे व सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रा. देवयानी फराद यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
आमदार निधीतून फरांदे यांनी समाजमंदिरासाठी दोन कोटी १८ लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून समाजमंदिर बांधून देण्याची हमी मिळाली कार्यसम्राट आमदार’ ही पदवी आम्ही समाजातर्फे बहाल केली आहे. आमचा समाज बांधव तुमच्या पाठीशी सर्वशक्तिनिशी आहे, असे पत्रात म्हटले आहे. समस्त चर्मकार समाजातर्फे उमेदवार प्रा. देवयानी फरादे यांना पत्रकाद्वारे पाठिंबा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. अध्यक्ष गणेश कानडे, उपाध्यक्ष अतिश काथवदे, सेक्रेटरी गौरव झावरे, खजिनदार श्रीकांत भोई, चिटणीस अक्षय काथवटे यांनी लिहिलेल्या पत्रात देवयानी फरादे यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत.
अखिल भारतीय मातंग संघातर्फे जिल्हाध्यक्ष गमाजी घोडे यांनी आमदार फरादे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रावर ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी विठ्ठल कांबळे, नारायण कांबळे, किशोर शिरसाठ, आत्माराम लगड, संदीप पालखे, शिवाजी अवचार, संतोष घोडे, गजानन रणबावळे, विलास साळवे, शिवाजी घोडे, गुलाब कांबळे, लहुजी साळवे, जनार्दन पारवे, भगवान घोडे, सुरेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. समस्त भोई समाज पंच ट्रस्टने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात फरांदे यांनी समाजमंदिरासाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. एक कोटी ७५ लाख रुपये निधीतून समाजमंदिर, जंगलीदास महाराज मठ धर्मशाळा तसेच युवकांसाठी तालीम बांधकाम मार्गी लावले आहे. प्रा. फरादे यांना कायमच पाठिंबा असून या निवडणुकीत सर्व समाज पूर्णशक्तीनिशी पाठिशी आहे, असे पत्रकात म्हटले आहे.