नाशिक: श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात 3 पासून ब्रह्मोत्सव

नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे गंगापूररोड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात शारदीय ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३ ते १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

उत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता महापूजेने होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ध्वजपूजन होणार आहे. भाविकांनी शारदीय ब्रह्मोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ट्रॅफिक वॉर्डनच्या कानशिलात लगावली; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790