नाशिक: सावत्र बापाकडून मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): पत्नी आणि दोन मुली किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेल्यानंतर घरात एकटी असलेल्या मुलीला जवळ बोलावून घेत चाकूचा धाक दाखवून सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित बापावर बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अत्याचारानंतर मुलीने जोरजोराने रडण्यास सुरुवात केली असता नराधम बापाने तिच्या आईसह दोन्ही बहिणींना चाकूने जिवे मारून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला अटक केली आहे. त्यास सोमवारी (दि.२३) न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790