धक्कादायक: नाशिक: दिरासह चुलत सासऱ्याने केले विवाहितेवर लैंगिक अत्याचार…

नाशिक (प्रतिनिधी): विवाहितेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती दाखवून विवाहितेवर चुलत दिरासह चुलत सासऱ्याने तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला ही देवळाली कॅम्प परिसरात राहते. फिर्यादीची आरोपी चुलत सासू हिने पीडित महिला ही एके दिवशी आंघोळ करीत असताना तिचे नग्नावस्थेतील फोटो तिच्या नकळत काढले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : पुरातत्त्व संवर्धनाच्या कामांना गती देण्याचे डॉ. किरण कुलकर्णी यांचे निर्देश

हे फोटो आरोपी चुलतदीर याने पीडितेचा पती व नातेवाईकांना पाठविण्याची भीती दाखवून, तसेच व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केले, तसेच पीडितेचे चुलतसासरा यांनीसुद्धा चुलतसासूच्या मदतीने मुक्तिधाम येथील एका लॉजवर बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग; २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

यावेळी लॉजमध्ये काढलेले विवाहितेचे अश्लील फोटो तिच्या सासूला व पतीला दाखवून संगनमत करून चुलतदीर, चुलतसासरा व चुलतसासू यांनी संगनमत करून पीडितेची बदनामी केली. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एक महिला व दोन पुरुषांसह लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790