नाशिक: विवाहितेची ४ वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे (२३) या विवाहितेने चार वर्षांचा मुलगा रियांश (५) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मृत अश्विनी हिचे वडील परशराम आबाजी पाटील (रा. निळवंडी ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते, त्याला अश्विनी विरोध करत होती, या कारणावरून तसेच माहेराहून दोन लाख रुपये आणावे यासाठी सासू व पती यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परशराम पाटील यांनी दिली आहे

याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती समाधान भिकाजी ढगे व सासू लीलाबाई भिकाजी ढगे (रा. राशेगाव) यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790