नाशिक (प्रतिनिधी): राज्यात गुरुवारी (दि. २७) नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भात जोरदार पाऊस होणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात सध्या कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, रायगड, महाबळेश्वर या ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होत असून २७ जूनला येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणीही जोरदार पाऊस राहणार आहे. मात्र या कालावधीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
![]()

