नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रविवार कारंजा परिसरातील नगरपालिका काळातील धोकादायक बनलेल्या यशवंत मंडई पाडण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली निघाली असून मंडई पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या जागेवर आता बहुमजली वाहनतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगरपालिका काळात रविवार कारंजा येथे यशवंत मंडई बांधण्यात आली होती. मात्र आता रविवार पेठेत वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर झाल्याने येथे पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रकल्प समाविष्ट केला गेला.
या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. पालिकेच्या इमारत पाडण्याच्या निर्णयाविरोधात इमारतीतील २४ भाडेकरू उच्च न्यायालयात गेले होते. त्यात याचिकाकर्त्यांना भाडेकरू असल्याचे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिला, अशी माहिती उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.