नाशिक: दुचाकीच्या चेनमध्ये साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेच्या साडीचा पदर चेनमध्ये अडकून रस्त्यावर पडल्याने महिला ठार झाली. अंबड लिंकरोड वजनकाट्याजवळ हा अपघात घडला.

एमआयडीसी पोलिस पोलिसांनुसार, अनिता पांडुरंग येडे (३८, रा. चुंचाळे, दत्तनगर) या दुचाकीच्या पाठीमागे बसून जात असताना साडीचा पदर दुचाकीच्या चेनमध्ये अडकला. रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांना मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगरटाकळी मार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790