नाशिक: शहरात ४४२ टवाळखोरांना ‘खाकी’चा दणका !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिट यांनी अंमली पदार्थाचे विक्री/सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईत इसमांचा शोध घेण्यासाठी तसेच टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करून सर्व पोलीस ठाणे हददीत विशेष मोहिम राबविली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका व गुन्हेशाखा युनिट -१, खंडणी विरोधी व गुंडा विरोधी पथक यांनी सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २०६ इसमांविरूध्द व परिमंडळ-२ हददीतील सातपर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदीरानगर, उपनगर, नाशिकरोड, दे. कॅम्प, गुन्हेशखा युनिट -२, दरोडाशस्त्र विरोधी व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी २३६ इसमांविरूध्द अशा एकुण ४४२ इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

तसेच नाकाबंदी दरम्यान एकुण ३२ वाहनांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघनार्थ १६ हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here