Amazon

नाशिक: सोमवार पेठेतील सोन्याचे दुकान फोडून 2 लाखाचा ऐवज लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सोमवार पेठ येथील धनलक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना शनिवार (ता. ११) उघडकीस आली.

भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ व २० सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; नाव नोंदणीची संधी

तक्रारदार देवेंद्र दंडगव्हाळ यांचे सोमवार पेठ येथे सराफी दुकान आहे. बुधवार (ता. ८) नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले.

काही कारणास्तव गुरुवार (ता. ९) दुकान उघडले नाही. शुक्रवारी (ता. १०) दुकानाच्या मागील बाजूचा दाराचा कडीकोयंडा तुटला असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. दुकानात प्रवेश करून पाहणी केली असता, चांदीची भांडी, हळदी-कुंकूचे करंडे, पाने, तोरड्या अशा विविध प्रकारच्या अडीच किलो चांदीच्या वस्तू, दागिने आणि सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोराने लंपास केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

गजबजलेल्या परिसरात अशाप्रकारे चोरी झाल्याने परिसरातील आश्चर्य व्यक्त करण्यात आले. श्री. दंडगव्हाळ यांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. अधिक तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790