नाशिक: डॉ. त्र्यंबके महापालिका सेवेतून कार्यमुक्त; डॉ. रावते यांच्याकडे कार्यभार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मलेरिया विभागात वादग्रस्त ठरलेले डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना महापालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

डॉ. त्र्यंबके यांच्याकडील मलेरिया विभागाचा कार्यभार आता डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

शहरात डेंगीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. अनेकदा तक्रारी येऊनही दखल घेतली जात नव्हती. डेंगी वाढीमुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात १९३ डेंगी बाधितांची नोंद झाली.

त्यानंतर नाशिक रोड येथील आनंदनगर भागातील एका व्यावसायिकाचाही डेंगीच्या संशयाने मृत्यू झाला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात ८९ डेंगीबाधितांची नोंद झाली, तर ८०१ रुग्ण संशयित निघाले.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत दररोज १०० डेंगी संशयित रुग्णांचे रक्तनमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहे. त्यामुळे आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग मृत्यू संशोधन समितीची बैठक बोलविण्यात आली.

त्यात अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. डॉ. त्र्यंबके जीवशास्रज्ञ असल्याने त्यांच्याकडे पालिकेच्या मलेरिया विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

धूर फवारणी ठेका व कर्मचाऱ्यांचे ईपीएफ न भरणे यामुळे डॉ. त्र्यंबके वादात सापडले होते. त्यामुळे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी तातडीने पालिकेच्या सेवेतून त्यांना कार्यमुक्त केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790