महत्वाची बातमी: गणेशोत्सव कालावधीत सिटीलिंक बसेसच्या वाहतूक मार्गात बदल…

नाशिक (प्रतिनिधी): सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन आज होत आहे. त्यामुळे घरोघरी होणाऱ्या श्रींच्या आगमनाबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने देखील विविध देखावे सादर करण्यात येऊन गणेशोत्सव साजरा केला जातो.

मुख्य म्हणजे उत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वतीने साकारण्यात आलेले देखावे बघण्यासाठी भाविकांची देखील मोठी गर्दी होती असते. गणेशोत्सव कालावधीत सिटीलिंक बसेसच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टळणार असल्याने भाविकांना श्रींच्या दर्शनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे. बदल करण्यात येत असलेले मार्ग खालीलप्रमाणे-

मार्ग क्रमांक 101 – निमाणी ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक 102 बी – तपोवन ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक 103 ए – निमाणी ते सिम्बायोसिस कॉलेज, मार्ग क्रमांक 194 – सुकेणा ते सिम्बायोसिस कॉलेज, 111 – निमाणी ते म्हाडा कॉलनी, 116- तपोवन ते बारदान फाटा, 127 ए – तपोवन ते चुंचाळे गाव, 128 ए – निमाणी ते चुंचाळे गाव. 131 ए – तपोवन ते गिरणारे, 245- नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर, 245 ए नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर या मार्गावरील सर्व बसफेऱ्या या निमाणी – दिंडोरी नाका – पेठ फाटा – मखमलाबाद नाका – गंगापूर नाका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच शहरात येताना सदर बसेस अशोकस्तंभापर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका – पेठनाका – दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

2) मार्ग क्रमांक 104 तपोवन ते पाथर्डी गाव, मार्ग क्रमांक 104एस -निमाणी ते शरयू नगर, 106 ए – निमाणी ते अमृतानगर, 107 ए – निमाणी ते अंबडगाव, 109 ए – तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, 137 – निमाणी ते जातेगाव या मार्गावरील सर्व बसेस निमाणी येथून जुना आडगाव नाका – पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल – द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक मार्ग जाऊन पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच शहरात येताना सदर बसेस अशोकस्तंभापर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका – पेठनाका – दिंडोरी नाका व निमाणी मार्गे मार्गस्थ होतील.

3) मार्ग क्रमांक 108 नवीन सीबीएस ते सुकेणा, मार्ग क्रमांक 132 – नवीन सीबीएस ते सायखेडा, मार्ग क्रमांक मार्ग क्रमांक 133 – नवीन सीबीएस ते सय्यदपिंप्री, मार्ग क्रमांक 144 – नवीन सीबीएस ते मोहाडी, मार्ग क्रमांक 152 – नवीन सीबीएस ते पिंपळगाव बसवंत, मार्ग क्रमांक 160ए – नवीन सीबीएस ते कोचरगाव मार्ग क्रमांक 163 – नवीन सीबीएस ते भुजबळ नॉलेज सिटी, मार्ग क्रमांक 147 – नवीन सीबीएस ते मोहाडी सदरील मार्गांवरील सर्व बसेस सायंकाळी 6 वाजेनंतर निमाणीपासून सुटतील व निमाणीपर्यंत येतील.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

4) मार्ग क्रमांक 129 ए – निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक 130ए – निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक 146 ए – निमाणी ते सिन्नर, मार्ग क्रमांक 148 ए – निमाणी ते भैरवनाथ नगर, मार्ग क्रमांक 166 ए – निमाणी ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक 208- ओझर बसस्टँड ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक 210 – दिंडोरी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक 243 – बोरगड एअरफोर्स गेट ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक 244 – बोरगड ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक 247 – मोहाडी स्टँड ते नाशिकरोड डेपो, मार्ग क्रमांक 260 – मखमलाबाद ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक 263 – भुजबळ नॉलेज सिटी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक 266 ए – तपोवन ते नाशिकरोड या मार्गावरील सर्व बसेस निमाणी येथून जुना आडगाव नाका – पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल – द्वारका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तर नाशिकरोडकडून येताना द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक – सीबीएस – अशोकस्तंभापर्यंत पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका, पेठनाका, दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.

हे ही वाचा:  नाशिक: सराफ व्यावसायिकाने केली सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची सव्वा पंधरा लाख रूपयाची फसवणूक

5) मार्ग क्रमांक 201 – नाशिकरोड ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक 202 – नाशिकरोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते बारदान फाटा 203 – नाशिकरोड ते सिम्बायोसिस कॉलेज, सिम्बायोसिस कॉलेज 211 – नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते आशीर्वादनगर, सिम्बायोसिस कॉलेज 238 – नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सिम्बायोसिस कॉलेज 242 – नाशिकरोड रेल्वेस्टेशन ते गंगापूर गाव मार्गावरील बसेस नाशिकरोडकडून येताना द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच जाताना सिव्हिल-मोडक सिग्नल-गडकरी चौक-सारडा सर्कल व चौक व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील.

या मार्गावरील बदल दिनांक 19 ते 28 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत करण्यात आलेले आहेत. तरी वाहतूक मार्गातील बदल प्रत्येक दिवशी सायंकाळी 6 वाजेपासून करण्यात येतील तसेच ऐनवेळी पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक बदलदेखील करण्यात येऊ शकतात. तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. तसेच मार्गांसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास किंवा माहिती हवी असल्यास 8530057222 किंवा 8530067222 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790