नाशिक: कारने गणेशमूर्ती नेणाऱ्यानेच दिली गणेश भक्तांना धडक ;चिमुकलीसह ६ जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज श्रीगणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. आज सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यात एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे, नाशिकमध्ये एका भरधाव चारचाकीने बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी निघालेल्या गणेश भक्तांना जोरदार धडक दिली आहे.

अधिक माहिती अशी की, मनमाडमध्ये बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी ५ ते ६ गणेशभक्त निघाले होते. मात्र या सर्वांना भरधाव चारचाकीने धडक दिली. यावेळी ते सर्वजण जखमी झाले. यात वाईट बाब म्हणजे जखमींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश होता.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

संबंधित धडक दिलेल्या कारचा वेग इतका होता कि, रस्त्यावर असलेल्या इतर ४ ते ५ दुचाकींचे देखील नुकसान या अपघातात झाले.

हा कार चालक नांदगावचा असल्याचे म्हटले जात असून तो गणेश मूर्ती घेऊन नांदगावकडे जात होता. यावेळी त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात आहे. जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790