दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं! दोघा सख्ख्या भावांना टोळक्याने संपवलं; भरचौकात घडला प्रकार

नाशिक (प्रतिनिधी): लहान मुलांना मारहाण करणाऱ्यांपासून सोडवण्यास गेलेल्या २ तरुणांवर जमावाने सशस्त्र हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याने त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

चुंचाळे शिवारातील संजीवनगर शिवारात गुरुवारी हा प्रकार घडला. संतप्त नातेवाइकांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तेथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने मृतदेह पोलिस आयुक्तालयात नेल्याने तणाव निर्माण झाला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

जिल्हा रुग्णालयात उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्षदर्शी इब्राहिम खान, रईस अली खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनगर येथे एका लहान मुलाला काही तरुण मारहाण करत होते. हा वाद सोडवण्यास मीराज खान, इब्राहिम शेख दोघे गेले. याचा राग आल्याने काही तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली. रिक्षामधून काही तरुण येथे आले व दोघांना घरात घुसून बाहेर काढून त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here