नाशिक: ट्रकच्या धडकेत ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बिटको कॉलेज जवळील गुरुद्वारासमोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका वृद्धाला ट्र्कच्या धडकेत ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक ते द्वारका या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. आज सुद्धा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने ८४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होत असल्याचे दिसून आले. या दरम्यान बिटको कॉलेजजवळ असलेल्या गुरुद्वारासमोर पंडित शंकर पगारे (73) हे वृद्ध रस्ता ओलांडत असताना नाशिकरोडहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रकची पगारे यांना धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्याचे समजताच वाहतुकीच्या कोंडीत आणखी मोठी भर पडलेली दिसत होती. त्यामुळे रस्त्यावरही वाहनांच्या दोन्ही बाजूने मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत आज (दि. २) वीजपुरवठा बंद राहणार

घटनास्थळी वाहतूक पोलीस, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे हे दाखल होत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास हवालदार प्रभाकर बोडके करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790