Amazon

नाशिक: तीन दिवसांपासून ठप्प सिटीलिंक बस अखेर आजपासून पुन्हा धावणार

नाशिक (प्रतिनिधी): रखडलेल्या वेतनाची मागणी करत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर रविवारी (दि. ६) सांयकाळी मिटला.

बैठकीत जून महिन्याचे वेतन ९ ऑगस्टला तर जुलै महिन्याचे वेतन २२ ऑगस्टपर्यंत बोनससह देण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे आयडी बंद आहेत ते तातडीने सुरू करण्याचे, कर्मचाऱ्यांना पेमेंट  स्लिपसह जॉईंनिंगचे लेटर देण्याचे मान्य करण्यात आल्याने सोमवारपासून (दि. ७) सिटीलिंकच्या बसेस पुन्हा धावणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; प्रलंबित कामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे सिटीलिंकला मात्र ७५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

सिटीलिंकच्या माध्यमातून रोज ७५ हजार प्रवासी व २० हजार विद्यार्थी प्रवास करतात. या प्रवाशांच्या माध्यमातून सिटीलिंकला रोज सरासरी २५ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असते. सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन वर्षात पाच वेळा संप पूकारण्यात आला आहे. वारंवार असे संप होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विष्णू काकविपुरे मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये नेमका पगार किती याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.बैठकीत देखील याबाबत कर्मचाऱ्यांनी  प्रश्न उपस्थित केले.याबाबत सिटीलिंकचे व्यवस्थापक बंड यांनी डेपो परिसरात याबाबत सविस्तर पत्रकच लावणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790