नाशिक: जुन्या भांडणाची कुरापत काढून पाववडा विक्रेत्यावर कोयत्याने वार

नाशिक (प्रतिनिधी): पवननगर येथील व्यावसायिक तरुणावर जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज रात्री घडला.

अधिक माहिती अशी की पवननगर येथे पाववडा विक्रेता महेश (गुड्डू) संगपाळ याचे काही सराईत गुन्हेगारांशी जुने भांडण होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

हे भांडण संपवून टाकू असे सांगत त्यास आज (ता.११)रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान केवल पार्क परिसरात बोलविण्यात आले. त्या वेळी संशयितासह अन्य दोन साथीदारही असल्याचे समजते.

या तिघांनी मिळून महेशवर कोयत्याने सपासप छातीवर, डोक्यावर व मानेवर सात ते आठ वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वार करून केवल पार्कनजीक एका नाल्याजवळ त्यास टाकून त्या तिघांनी पलायन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

जखमी अवस्थेत विव्हळत असलेल्या महेश जवळून जाणाऱ्या महिलेने धाडस करीत त्याच्याच मोबाईलमधील एका व्यक्तीस घटनास्थळी बोलावून घेतले. त्या व्यक्तीने त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून याबाबत अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790