नाशिक: आजारी वडिलांना भेटायला आली, टेरेसवरुन मोठा आवाज, बघितलं तर..

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सातपूरच्या अशोक नगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरावरून गेलेल्या वीज तारांमुळे मनमाडहून नाशिकला माहेरी आलेली विवाहित महिला घराच्या टेरेसवर सुकवण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी गेली असताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने ती गंभीर रित्या भाजली गेली.

सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने महावितरणाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मनमाड येथे राहणारी विवाहित महिला राणी दशरथ चव्हाण या आजारी वडिलांना भेटण्यासाठी रो. हाऊस नंबर ४, उषा अपार्टमेंट, अशोकनगर सातपूर येथे आल्या होत्या राणी चव्हाण ह्या धुतलेले कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेल्या असता टेरेसवरून गेलेल्या वीज तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने त्या पाच फुट लांब फेकल्या गेल्या.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला होता कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी त्यांना तात्काळ अशोक नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राणी चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. राणी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या ५५ ते ६० टक्के भाजल्या आहेत.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

दरम्यान, घरांवरून गेलेल्या मोकळ्या वीज तारा काढण्याबाबत परिसरातील लोकांनी वारंवार निवेदने देऊनही विद्युत मंडळ दखल घेत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. विद्युत् मंडळाचा भोंगळ कारभार आणि हलगर्जीपणामुळे अजून किती दुर्दैवी घटना घडणार? असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीना कळवूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे तर काहींनी प्रतिसादच न दिल्याचे नागरिक म्हणत आहेत. ह्या सर्वसामान्य कुटुंबास शासकीय नियमानुसार मिळणारी मदत मिळण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790