Amazon

नाशिक: वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार ठार; हेल्मेट असते तर…

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका सर्कलकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. तर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्येही चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

दोन्ही घटनांमध्ये दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. कदाचित हेल्मेट असते तर दोघांचे प्राण वाचले असते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

अंबड औद्योगिक वसाहतीतून दुचाकीवरून भिमकुमार हेमराज सिंग (३८, रा. दामोदर चौक, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) हे रविवारी (ता. २) सकाळी घराकडे परतत होते. त्या वेळी डेल्टा कंपनीसमोरच अज्ञात चारचाकीने त्यांना धडक दिली. सिंग यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आज (दि. २७) मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, २५ जूनला सायंकाळी गोविंदनगर येथील सत्यम स्वीटसमोर इंदिरानगर बोगद्याकडून मुंबई नाक्याकडे दुचाकीवरून मधुकर कारभारी गांगुर्डे (५०, रा. नागसेन नगर, वडाळ नाका) जात होते. त्या वेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकीने धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड, मनमाडसह मुंबई-पुण्याहून दिवाळीनिमित्त ४१८ विशेष रेल्वेगाड्या

या अपघातामध्ये गांगुर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790