🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: इंदिरानगरला झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार; दोन जखमी

नाशिक (प्रतिनिधी): दोन दुचाकींत झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. इंदिरानगर येथील साईनाथनगर परिसरात ही घटना घडली. अनिल विश्वनाथ सावंत (रा. ३३ शिवाजीवाडी, विनयनगर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

एका दुचाकीवर चार्वाक चौकाकडून साईनाथनगर सिग्नलकडे दुचाकीने सीट जात होते. तर तर दुसऱ्या दुचाकीवरून अनिल सावंत हे येत होते. या वेळी दुचाकींची समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला. यातील दुचाकी चालक अनिल सावंत यांचा अतिरक्तस्रावाने जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उद्योग सुलभीकरणासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

पोलिसांनी तत्काळ दाखल होत घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचारार्थ पाठवले. तर या अपघातातील अन्य दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात घडल्यानंतर येथे खासगी रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेत असलेल्या चालकासह डॉक्टर यांनी या अपघातग्रस्तांना आमच्या रुग्णालयात दाखल करणार असाल तरच आम्ही घेऊन जाऊ, असे सांगितले. प्रसंगी जमलेल्या नागरिकांचा रोष बघत व पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: KOTA IIT अकॅडमीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; वर्षभर पसार असलेले आरोपी राजस्थानातून ताब्यात

याबाबत शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी ऋषिकेश वर्मा व वसीम सय्यद यांनी या गैरप्रकाराबाबत इंदिरानगर पोलिसात सदर रुग्णवाहिका चालक व डॉक्टर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790