Amazon

नाशिक: दुध व्यावसायिकाला मारहाण करून लुटले; तिघांविरोधात गुन्हा, एकाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): शिवाजीनगर परिसरातील असलेल्या दूध डेअरी व्यावसायिक व त्यांच्या वाहनचालकास तिघा संशयितांनी संगनमत करून मारहाण केली.

तसेच, दूध व्यावसायिकालाही मारहाण करीत दुखापत केली आणि त्यांच्याकडील ५० हजार रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एससी, एसटी प्रवगातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

सौरभ यादव (रा. शिवाजीनगर, सातपूर), सुजित (पूर्ण नाव नाही) व एक अनोळखी संशयिताने सदरील कृत्य केले. याप्रकरणी सौरभ यादव यास अटक करण्यात आली आहे. दिलीप नरहरी तांबे (रा. सद्‌गुरु कृपा रोहाऊस, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची धर्माजी कॉलनी बसथांब्याजवळ दूध डेअरी आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार असूनही आज बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

गेल्या सोमवारी (ता. १२) रात्री पावणे नऊच्या सुमारास तिघा संशयितांनी संगनमत करून तांबे यांच्या मालकीच्या असलेल्या छोटा हत्ती वाहनावरील चालक अनिल बोडके यांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली.

त्याचा जाब तांबे यांनी विचारला असता, संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संशयितांनी दुधाच्या कॅनचे झाकण त्यांना मारून दुखापत केली. तसेच त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गणेश शिंदे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. याप्रकरणी सौरभ यादव यास अटक करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790