नाशिक: गंगापूररोडला महिलेला गार्डनमध्ये बोलावून मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूररोडवरील दत्तचौक भागात गार्डनमध्ये बोलावून घेत एकाने शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत रामदास मरकड (रा. रामकृष्णनगर, शांतीनगर) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

संशयिताने रविवारी (दि.४) ओळखीचा फायदा उचलत पीडितेस दत्तचौक भागातील सुयोजित गार्डन मध्ये बोलावले होते. महिला गार्डनमध्ये गेली असता ही घटना घडली. संशयिताने तिला शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790