नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी पोलीसांनी मोठी कारवाई करत नाशिकहुन मुंबईला अवैध गुटखा घेऊन जात असलेले दोन कंटेनर इगतपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन या दोन कंटेनरसह जवळपास एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी नाशिक मुंबई महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस अधिक्षक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस हवालदार दिपक अहीरे, किशोर खराटे, चेतन सवस्तरकर, गिरीष बागुल,विनोद टिळे व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटींदे, निलेश देवराज यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर सापळा लावुन नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या दोन कंटेनरची तपासणी केली असता त्यामधे मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
पोलीसांनी दोन कंटेनर मधील ८० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला असुन यात 4KSTAR , SHK या कंपनीचा गुटखा पकडला आहे. यासह दोन कंटेनर HR 38 Z3937 व HR 47 E 9140 जप्त करण्यात आले आहे. असे एकुण १ कोटी २८ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत चालक सलमान अमीन खान, वय ३० व इरफान अमीन खान, वय ३१ रा. जि. पलवल, हरीयाणा या दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडेसह पोलीस पथक करीत आहे.