नाशिक: औषधी गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तरुणीचा मृत्यू…

नाशिक (प्रतिनिधी): विहीतगाव परिसरात औषधी गोळयांचे अतिसेवन केल्याने २१ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. वैशाली सुर्यकांत लोंढे (रा. भुटकीरोड, विहीतगाव ना.रोड) असे मृत युवतीचे नाव आहे.

गेली दहा दिवस तरूणीवर उपचार सुरू होते. याप्रकरणी उपगनर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  TCS प्रकरण: फॉरेन फंडिंगचा संशय; एटीएस, ‘एनआयए’शी पत्रव्यवहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली लोंढे या तरूणीने गेल्या २९ एप्रिल रोजी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात औषधी गोळयांचे अतिसेवन केले होते.

दुस-या दिवशी ती बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने भाऊ कानिफनाथ लोंढे यांनी तिला तत्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (दि.९) सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ. उमंग अग्रवाल यांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790