नाशिक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रदिनी मिळाले होते विशेष पदक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील वादग्रस्त ठरलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलासह शहरात एकच खळबळ उडाली आहे…

गुन्ह्याच्या तपासादरम्यान 4 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की आ. सुहास कांदे हे एन. डी. सी. सी. बँकेचे उपाध्यक्ष असताना एका महिलेने काही इसमांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दि. 10 नोव्हेंबर 2016 रोजी दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-2 चे तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे करीत होते. नीलेश माईनकर यांनी गुन्ह्यातील आरोपींना भीती दाखवून मला आरोपी करून विनाकारण या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

त्यादरम्यान, मला अटक होऊ नये यासाठी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबत होतो. तरीही या गुन्ह्याशी माझा वैयक्‍तिक कोणताही संबंध नसताना या गुन्ह्यात 23 डिसेंबर 2016 रोजी समजपत्र देऊन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे मला या गुन्ह्यात अटक होऊन माझ्या राजकीय कारकीर्दीस धोका निर्माण होऊ नये म्हणून मी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार मला कोर्टाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

नाशिकमधील कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात इमारती वरून पडून दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर मी तपास अधिकारी माईनकर यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशीकामी त्यांच्यासमक्ष हजर राहून माझा जबाब दिला होता, असेही कांदे यांनी म्हटले आहे. नीलेश माईनकर यांनी मला धमकी देऊन व ब्लॅकमेल करून माझ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याने दि. 7 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार अर्ज दिला होता. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे 9 जानेवारी 2017 रोजी माईनकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल होण्यासाठी अर्ज दिला असल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे; परंतु वेगवेगळ्या खात्यांकडे तक्रारी देऊनदेखील तेच तपासी अधिकारी असल्याने वेळोवेळी त्यांनी मला “माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला केसेसमध्ये पुरता अडकवीन,” अशा धमक्या देऊन दबाव आणत बेकायदेशीर रकमेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची शहानिशा करून कांदे यांना दोषमुक्‍त केले होते. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाल्याने कांदे यांनी माईनकर यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 156 (3) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्ट नं. 6 यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माईनकर यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 384, 385, 389 सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 13 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790