नाशिक (प्रतिनिधी): ब्रह्मगिरीवर दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूचा अंगावर दगड पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास अश्रू आरडे (वय ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्यामुळे त्यांच्या हातपाय आणि डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- नाशिक: अपघातात ८ वर्षांची मुलगी गेली, बापाने रस्त्यावरच हंबरडा फोडला…
- नाशिक शहरात अपार्टमेंटवर दरोडा पडण्यापुर्वीच पोलिसांची झडप
- नाशिकला घराच्या छतावरून पडल्याने महिलेचा मृत्यू; सिडकोतील घटना
तसेच या घटनेची माहिती तात्काळ त्र्यंबक पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी दाखल होत ब्रह्मगिरीवरून डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार लगत आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबक राजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेने मृतदेह खाली आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून आरडे यास मृत घोषित केले.