नाशिक: ओळखीच्याच तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. मुलगी गर्भवती… अखेर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल सोमनाथ गंगावणे (२१ रा. राजीवगांधीनगर, गोवर्धन, गंगापूरगाव) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत आहे. संशयिताने ओळखीतून मुलीस लग्नाचे आमिष दाखवत हे कृत्य केले. नोव्हेंबर २०२२ मध्ये संशयिताने मुलीचे घर गाठून एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर दमदाटी करीत बलात्कार केला.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

यानंतरही त्याने वेळोवेळी आपल्या घरी घेवून जात मुलीवर बलात्कार केला. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने कुटुंबियाने संशयितास जाब विचारला असता त्याने पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला येथे राहू देणार नाही अशी धमकी दिली. मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790