नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी अग्निवीर जवानाचा उष्माघाताने मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीराचे प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (२१, मूळ रा. शिंदखेडा, जि. धुळे) असे मयत अग्निवीर जवानाचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महा उपलब्धी ॲप वापराबाबत नाशिकला 10 सप्टेंबर रोजी कार्यशाळा

देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २१) पहाटेपासून आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी असलेल्या अग्निवीर जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. यादरम्यान, सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अग्निवीर जवान हर्षल ठाकरे याची प्रकृती बिघडली.

त्यास उलट्या झाल्या आणि तापही आला. त्यामुळे त्यास लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परंतु त्याचा दुपारी एक वाजेच्या सुमारास मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रानभाजी महोत्सवातून महिला बचतगटांना बाजारपेठ, लखपती दीदी बनण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्युचे निश्‍चित कारण स्पष्ट होऊ शकेल. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790