नाशिक शहर: दोन सख्ख्या भावांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा दात तोडला

नाशिक (प्रतिनिधी): शरणपूर रोड भागात वाहनाचे आरसी बुक मागितल्याच्या कारणातून दोघा भावांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत एकाचा दात तुटल्याने तो जखमी झाला असून, याप्रकरणी भाऊ भावजयीसह पुतण्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  आषाढी एकादशीनिमित्त नाशिक विभागातून ३०० जादा एसटी बसेस; २० ते ३० जुलैदरम्यान विशेष नियोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गागरे (४८) अरूणा गागरे (४५) व आदित्य गागरे (१९ रा.गुलमोहरनगर, म्हसरूळ) अशी दात तोडणा-या भाऊ भावजयीसह संशयित पुतण्याचे नाव आहे. याप्रक्रणी प्रशांत भागवत गागरे (४३ रा.श्री तिरूमला ओंकार, सिरीन मिडोज) यांनी तक्रार दाखल केली आहे. संतोष गागरे व प्रशांत गागरे हे सख्खे भाऊ असून ते विभक्त राहतात. मंगळवारी (दि.१८) सायंकाळी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबियांसह शरणपूररोड येथील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत नातेवाईकांकडे गेले असता ही घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बनावट देशी तूप निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; एफडीएची धडक कारवाई

पाहूणे मंडळीत गप्पा गोष्टी सुरू असतांना प्रशांत गागरे यांच्या पत्नीने वाहनाचे आरसीबुक मागितल्याने हा वाद झाला. संतप्त संशयितांनी अश्लिल शिवीगाळ करीत प्रशांत गागरे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत त्यांचा दात तुटल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790