नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Breaking: सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनाबाबत महत्वाची अपडेट
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगगडावर आज दि. 30 मार्चपासून चैत्रोत्सव सुरू होत आहे.
त्यामुळे दि. 30 मार्च ते दि. 7 एप्रिलपर्यंत पायथ्याशी असलेल्या नांदुरी ते सप्तशृंगगड या मार्गावर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
गडावर जाण्यासाठी फक्त एस. टी. वाहतुकीची सोय राहील. नांदुरी ते सप्तशृंगगड हा रस्ता अरुंद व वळणावळणांच्या घाटाचा असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी गडावर जाण्यासाठी एस. टी. बसचा वापर करावा, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.
![]()


