नाशिक: तिडके कॉलनीत कारची काच फोडून ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: तिडके कॉलनीत कारची काच फोडून ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

नाशिक (प्रतिनिधी): तिडके कॉलनी भागात कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉपसह, मोबाईल, हेडफोन, स्मार्ट वॉच व पॉवर बॅक चार्जर असा सुमारे ८५ हजाराचा ऐवज होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगरटाकळी मार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू

या चोरीप्रकरणी विवेक श्रीधर हरणे (रा.दिघी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरणे बुधवारी (दि.२२) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी आपली कार तिडके कॉलनीतील राजभोग हॉटेल समोर पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून पाठीमागील सिटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप, मोबाईल, हेडफोडन, स्मार्ट वॉच व पॉवर बँक असा सुमारे ८४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास जमादार केशव आडके करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790