Amazon

Breaking: नाशिककडे येणारा तब्बल २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त !

Breaking: नाशिककडे येणारा तब्बल २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त !

नाशिक (प्रतिनिधी): इंदूर येथून नाशिककडे जाणारा सुमारे 26 लाख 31 हजार पाचशे रुपये किमतीचा रजनीगंधा, पान मसाला गुटखा आणि तंबाखूचा साठा धुळे तालुका पोलिसांनी आर्वी येथे जप्‍त केला आहे, तर आणखी एका कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला आहे.

मागील वीस दिवसांत धुळे तालुक्यात तिसरी कारवाई झाली आहे, तर अवैध गुटखा विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. धुळे तालुका परिसरातील अवैध गुटखा प्रकरणे निदर्शनास येत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 3 व 4 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; शिबिरांतून नाव नोंदणीची संधी

धुळे तालुका पोलिसांना इंदूर येथून नाशिककडे जाणारा रजनीगंधा पानमसाला गुटखा आणि तुलसी तंबाखूचे एकूण बारा पार्सल यांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने आर्वी येथे सापळा रचून सुमारे 26 लाख 31 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून, पोलिसांकडून होणार्‍या कारवायांमध्येदेखील वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारवाईत 13 लाख 99 हजार 680 रुपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला, 1 लाख 55 हजार रुपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला, गुटख्याच्या पांढर्‍या गोणीचे पार्सल, 3 लाख 76 हजार 320 रुपये किमतीची तुलसी तंबाखू असलेल्या दोन गोण्या आणि सात हजार रुपये किमतीचे आयशर वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तसेच धुळे तालुक्यातील मांडळ शिवारात गांजाची लागवड करणार्‍या शेतकर्‍यावर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत त्याच्या शेतातील पाच लाख 970 रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला आहे याप्रकरणी गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

काही दिवसांपूर्वीच लाखोंचा गुटखा जप्‍त:
धुळे शहरातील आर्वी शिवारातून तालुका पोलिसांनी सुमारे 9 लाख 93 हजार 180 रुपये किमतीची अफू जप्‍त केली आहे. या कारवाईत वाहनांसह तब्बल 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आल्याची घटना घडली होती, तर त्याआधी देवपूर भागात असलेल्या वीटभट्टी परिसरात तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्‍त करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790