नाशिक (प्रतिनिधी): दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो, यानिमित्ताने अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या अपोलो कॅन्सर सेंटर मुंबई आणि नाशिक सर्जिकल सोसायटी तर्फे आरोग्यपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपोलो कर्करोग विभागाचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेष्ठ कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अनिल डिक्रूज, पोटाचे आणि लिव्हरचे कर्करोग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.राजेश शिंदे आणि किडनी कर्करोग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अश्विन ताम्हणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन हॉटेल एमराल्ड पार्क येथे करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ.अनिल डिक्रूज म्हणाले कि “भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, तंबाखूचे कोण्यातही प्रकारचे सेवन म्हणजेच गुटखा, सिगरेट, विडी, मशेरी हे अत्यंत हानिकारक आहे, कर्करोगाचे लवकर निदान आणि योग्यवेळी उपचार झाल्यास रुग्ण दगावण्याचा धोका कमी असतो.
अपोलो हॉस्पिटल समूह हा नेहमीच अत्याधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी आग्रही आहे, मग ते भारतातील पहिले पेट स्कॅनचे मशीन असो अथवा नव्याने सुरु झालेले भारतातील पहिले कँसर प्रोटॉन थेरपी असो. आतंरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून सर्व सामान्यांना मिळाव्यात, हाच यामागचा मुख्य हेतू आहे.
अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई चे कर्करोग तज्ञ आता अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये महिन्यातून दोनदा रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचार करण्यासाठी उपलब्ध असतील आणि याचा फायदा नाशिक सोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला होईल”.
डॉ. अनिल डिक्रूज हे हेड आणि नेक कॅन्सरमध्ये स्पेशलायझेशन असलेले देशातील सुप्रसिद्ध कर्करोग शस्रक्रिया तज्ञ तसेच अपोलो कॅन्सर विभागाचे संचालक आणि भारतातील वरीष्ठ कॅन्सर सर्जन आहेत, डॉ. डिक्रूज हे आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (जिनिव्हा) चे अध्यक्ष असून कर्करोगाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचा त्यांना 33 वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी बरेच कॅन्सर तज्ञ आणि सर्जन घडवले आहेत भारताच्या प्रत्येक शहरात त्यांचे विद्यार्थी आहेत.
डॉ. डीक्रूझ हे जिनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या युनियन इंटरनॅशनल फॉर कॅन्सर कंट्रोलचे अध्यक्ष-निर्वाचित (2018-2020) आणि अध्यक्ष (2020-2022) आहेत. हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय आहेत. कर्करोगाचा लवकर शोध घेणे आणि तोंडी पोकळीचे कर्करोग, लॅरींजियल कर्करोग, थायरॉईड आणि पॅराथायरॉईड कर्करोग तसेच लेसर शस्त्रक्रिया करण्यात त्यांचे कौशल्य आहे. डॉ.डिक्रूज यांनी याआधी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक आणि हेड नेक सर्व्हिसेसचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. 250 हून अधिक पेपर्स आणि जर्नल्स मध्ये त्यांचे लेख आणि केसेस प्रसिद्ध झाल्या आहेत , त्यांची आंतराष्ट्रीय ख्याती असून त्यांना जग भरातून कॅन्सर चर्चा सत्रासाठी आमंत्रित करण्यात येते , त्यांनी जगभरात 500 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. या आरोग्य परिषदेला नाशिक मधील नामांकित शल्यचिकीत्सक आणि कर्करोग तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.